राज्य विज्ञान शिक्षण संस्था,
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर
केंद्र शासनाच्या शालेय विज्ञान शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने सन १९६८ मध्ये पुणे येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि १ एप्रिल १९८० साली नागपूर येथे स्थलांतरित करण्यास आली.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेशी संलग्न असलेल्या कार्यालयांच्या विकेंद्रीकरणामुळे १ एप्रिल १९८० पासून ही संस्था नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आली; आणि तेव्हापासून रवीनगर, नागपूर येथून संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
त्यानंतर, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना करण्यात आली (पूर्वीचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे). दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विभागस्तरावर पाच प्रादेशिक विद्या प्राधिकरणे (नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व मुंबई) निर्माण करण्यात आली. या पुनर्रचनेनुसार राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे नामकरण प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर असे करण्यात आले.
| स्थापना वर्ष (मूळ संस्था, पुणे) | सन १९६८ |
|---|---|
| नागपूर येथे स्थलांतर | १ एप्रिल १९८० |
| सध्याचे ठिकाण | रवीनगर, नागपूर |
| पुनर्रचना शासन निर्णय | १७ ऑक्टोबर २०१६ |
| सध्याचे नामाभिधान | प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर |
| राज्यातील समकक्ष प्राधिकरणे |
नागपूर अमरावती नाशिक औरंगाबाद मुंबई |
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर ही विज्ञान शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. संस्थेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :
पुणे येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली.
१ एप्रिल १९८० रोजी संस्था रवीनगर, नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आली.
शासन निर्णयानुसार प्रादेशिक विद्या प्राधिकरणांची स्थापना करण्यात आली.
रवीनगर, नागपूर येथून म्हणून कार्यरत.
आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्था राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेक शासकीय प्राधिकरणे, प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आणि क्षेत्रीय शासकीय यंत्रणांशी समन्वय राखून कार्य करते.
| संस्था / प्राधिकरण | ठिकाण |
|---|---|
| विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST) | भारत सरकार, नवी दिल्ली |
| राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) | नवी दिल्ली |
| राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM) | कोलकाता |
| डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र | मुंबई |
| नेहरू विज्ञान केंद्र | वरळी, मुंबई |
| रामन विज्ञान केंद्र | नागपूर |
| IISER (Indian Institute of Science Education and Research) | पुणे |
| यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी | पुणे |
| National Innovation Foundation (NIF) | अहमदाबाद |
वरील भागीदार संस्थांच्या सहकार्याने राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर खालील उपक्रम व योजना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर राबविते. प्रत्येक उपक्रमाचा सविस्तर तपशील प्रकरण ५ मध्ये दिलेला आहे.
उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था जिल्हा व विभागस्तरावरील खालील शासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कार्य करते :
| अ. क्र. | अधिकारी |
|---|---|
| १ | मा. जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य |
| २ | मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,महाराष्ट्र राज्य |
| ३ | मा. विभागीय शिक्षण उपसंचालक |
| ४ | शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / शिक्षण निरीक्षक / महानगरपालिका) |
| ५ | संस्थेचे प्रतिनिधी — विभागस्तरावर विज्ञान सल्लागार व जिल्हास्तरावर विज्ञान पर्यवेक्षक |
| ६ | जिल्हा समन्वयक (प्रत्येक जिल्ह्यातील कृतिशील शिक्षक) |